प्रिय निरंजन,
तुम्ही आयोजित केलेली केरळ सहल ही आनंददायी आणि सहप्रवाशांच्या वयाचा व सुखसुविधांचा पूर्ण विचार करून घडवून आणलेली एक आनंद यात्रा होती. या आनंद यात्रेच्या सुखद क्षणाच्या आठवणी ऐकणाऱ्यांच्या मनात निश्चितच हे भाव उमटल्याशिवाय राहणार नाही
"शुभ्र तुरे माळुनी आल्या निळ्या निळ्या लाटा
रानफुले देऊन सजल्या या हिरव्या वाटा "
ही सर्वांग सुंदर आनंद यात्रा घडवून आणल्याबद्दल खूप आभार आणि तुमच्या पुढील यशस्वी वाटचाली करिता खूप खूप शुभेच्छा
दिलीप संगेकर